नाशिक नोटप्रेस चोरी प्रकरण : ‘पाचशे’ची दहा बंडले गहाळ

अन्य समाचार
Share News

नाशिक रोड : भारत सरकारच्या जेल रोड येथील नोटा छापण्याच्या कारखान्यातून (चलार्थपत्र मुद्रणालय) पाचशे रुपयांचे एक अशी दहा बंडले म्हणजेच एकूण पाच लाख किमतीच्या नोटा गहाळ झाल्याची तक्रार मुद्रणालयाच्या व्यवस्थापनाकडून उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी प्रेस व्यवस्थापनाशी प्राथमिक चर्चा घेऊन माहिती घेतली. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती पोलिस उपायुक्त विजय खरात यांनी दिली. पाचशे’ची दहा बंडले गहाळउपायुक्त खरात म्हणाले, की नोटा गहाळ घटना गेल्या फेब्रुवारीमधील आहे. त्याच्या चौकशीसाठी मुद्रणालय व्यवस्थापनाने दक्षता व सत्यशोधन समिती नेमली होती. समितीच्या अहवालाच्या आधारे पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. समितीचा अहवाल पोलिसांना देण्यात आला. नोटांची अनेक बंडले असल्यामुळे ती इतर बंडलांमध्ये मिसळली की काय याचा शोध मुद्रणालय व्यवस्थापन घेत होते. त्यामुळे जुलैमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. पाच लाखांची चोरी झाली की या नोटा गहाळ झाल्या याबाबत विचारले असता उपायुक्त विजय खरात म्हणाले, की मुद्रणालय नियमानुसार अंतर्गत चौकशी केली. त्यासाठी सत्यशोधन समिती नियुक्ती केली होती. तिचा अहवाल आल्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचा निर्णय मुद्रणालयाने घेतला. त्यांचा प्रतिनिधी मंगळवारी (ता. १३) पोलिस ठाण्यात आला होता. सीसीटीव्ही फुटेज पोलिस तपासणारप्रेसमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिस तपासणार आहेत. तो महत्त्वाचा पुरावा आहे. गेल्या फेब्रुवारीमधील ही घटना आहे. सत्यशोधन अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. त्याचा अभ्यास करून तपास केला जाईल. दरम्यान, याबाबत प्रसारमाध्यमांना सविस्तर माहिती देण्यास मुद्रणालय व्यवस्थापन अथवा कामगार नेत्यांनी असमर्थता दर्शविली.