Aurangabad: औरंगाबाद हादरलं! अनैतिक संबंध ठेवलेल्या आईचं रुप मुलानं बघितलं; आईनेच पोटच्या गोळ्याला संपवलं!

प्रमुख समाचार

आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावात घडली.प्रियकराच्या मदतीने आईनेच आपल्या स्वतःच्या ९ वर्षीय मुलाला मारल्याची हृदय स्पर्शी घटना समोर आली आहे. सार्थक रमेश बागुल असे मृत मुलाचे नाव आहे. संगीता रमेश बागुल आणि तिचा प्रियकर साहेबराव पवार असे आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी (police) दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर तालुक्यातील तलवाडा शिवारात एका जंगलाच्या दरीमध्ये १७ फेब्रुवारीला पोलिसांना एक अनोळखी मुलाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळाला होता. मृतदेहावर असलेले कपडे आणि इतर गोष्टींमुळे पोलिसांना मृतदेहाची ओळख पटली होती. परंतु, खून कोणी आणि कसा केला याचा शोध पोलीस घेत होते. मुलाची अपहरणाची तक्रार देताना आणि मृतदेह सापडल्यावर आईच्या चेहर्‍यावर रडू किंवा दुःखाची भावना नसल्यामुळे पोलिसांना (police) मुलाच्या आईवर संशय आला होतात्यामुळे पोलिसांनी मुलाच्या आईला ताब्यात घेतले होते. मला मुलाने प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्यामुळे प्रियकराच्या मदतीने मीच त्याचा खून केला असल्याची धक्कादायक कबुली आईने पोलिसांना दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी प्रियकर साहेबराव पवार आणि संगीता बागुल यांना अटक करण्यात आला आहे.