त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेऊन तेथे आरोपी राहुल ब्राह्मणे याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याच्या ताब्यातून दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन, तसेच मॅफेड्रॉन पावडरचे १९० ग्रॅम वजनाचे सीलबंद केलेले पाकीट मिळून आले, तसेच २० रिकाम्या पिशव्या आढळून आल्या. आरोपी ब्राह्मणे हा हे अमली पदार्थ स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीररीत्या कब्जात बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने आढळून आला.पोलिसांनी केलेल्या कारवाईत मॅफेड्रॉनसह एक मोबाईल फोन असा १ लाख ५५ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात राहुल ब्राह्मणेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आला आहे.