रयत शिक्षण संस्थेच्या श्रीनाथ विद्यालय व कै. विजयकुमार उर्फ बाबासाहेब शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय, बोरगाव विद्यालयात शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी इयत्ता दहावी विद्यार्थ्यांसाठी शुभचिंतनाचा व इयत्ता बारावी विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी लेखक व कवी मा. श्री भास्कर नामदेव बंगाळे हे प्रमुख पाहुणे तर मा. श्री गायकवाड एन. एम. – प्राचार्य, न्यू इंग्लिश स्कूल, भाळवणी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते कर्मवीर भाऊराव पाटील, लक्ष्मीबाई पाटील व कै.बाबासाहेब पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विद्यालयाचे प्राचार्य श्री. गाडे डी. जे. यांनी विद्यार्थ्यांनी चांगले उच्च शिक्षण घेऊन आत्मसन्मानाने जगण्याचा संदेश देवून उपस्थित सर्व मान्यवरांचे विद्यालयाच्या वतीने स्वागत केले.
या शुभचिंतन समारंभामध्ये इ. 9 वीची विद्यार्थिनी कु. नम्रता गायकवाड हिने आपल्या मनोगतातून सर्व विद्यार्थ्यांच्यावतीने इ. 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या . इ.10 वी व 12 वीच्या विद्यार्थिनी कु. कृतिका पिसे, कु. अमृता गायकवाड व कुमारी सायली भांगे यांनी आपल्या मनोगतातून विद्यालयात आलेल्या सुखद अनुभवांना उजाळा दिला. विद्यालयाच्या शिक्षिका सौ पाटील एस. एस. व ज्यू. कॉलेजचे प्राध्यापक श्री मदने सर यांनी इ. 10 वी व 12 वी नंतर विविध क्षेत्रातील उपलब्ध संधी व आवश्यक जीवन कौशल्ये या विषयांवर मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुणे श्री बंगाळे सर यांनी विविध रंजक कथांमधून टीव्ही, मोबाईल पासून लांब राहून, व्यसनांपासून दूर राहून आदर्श नागरिक बनण्याचा संदेश दिला तर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गायकवाड एन. एम. यांनी मनोगतातून स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही, ध्येयाने प्रेरित होऊन आपले स्वप्न साकार करण्याचा मूलमंत्र दिला. निरोप समारंभानिमित्त शै. वर्ष 23 – 24 च्या इ. 10 व 12 वी च्या विद्यार्थ्यांनी विद्यालयास आऊजा कंपनीचे वायरलेस ब्लूटूथ स्पीकर, माइक सेट भेट दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पाटील ए. व्हि. तर आभार प्रदर्शन श्री गज्जम एस.एस. यांनी केले.