श्रीनाथ विद्यालय बोरगाव येथे 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
श्रीनाथ विद्यालय व कै. विजयकुमार उर्फ बाबासाहेब शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय बोरगाव येथे 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण विद्यालयाचे प्राचार्य श्री गाडे डी.जे. सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सर्जेराव जाधव (अध्यक्ष – ठोका संघटना महाराष्ट्र राज्य) तसेच अनेक पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर गावातून प्रभात फेरी काढण्यात आली त्यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देऊन राष्ट्रभक्ती जागृत केली. प्रभात फेरीच्या शेवटी विद्यालयात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली .
या प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना विद्यालयातर्फे व ग्राम पंचायत बोरगाव तर्फे खाऊवाटप करण्यात आले व कार्यक्रमाची सांगता झाली