बापानेच पोटच्या पोरांना विहीरीत फेकून घेतला जीव; नगरच्या घटनेमागील धक्कादायक कारण आले समोर

प्रमुख समाचार

पती-पत्नीमध्ये वाद होणे ही सामान्य गोष्ट आहे, पण कधी कधी वाद मोठा झाल्यानंतर भयानक घटनाही घडतात. आता अशीच एक घटना अहमदनगरमधून समोर आली आहे. यामध्ये आईवडिलांच्या वादात दोन चिमुकल्यांनी आपला जीव गमावला आहे.

पत्नीच्या भांडणामुळे वैतागलेल्या एका पतीने आपल्या दोन मुलांना विहीरीत फेकून दिले आहे. या घटनेत दोन्ही मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे. गोकूळ क्षीरसागर असे त्या व्यक्तीचे नाव आहे.

गोकूळ क्षीरसागर याने आपल्या मुलांना विहीरीत फेकून त्यांचा जीव घेतला आहे. त्यांना एक मुलगा आणि मुलगी होती. मुलीचे नाव ऋतुजा होते आणि ती ८ वर्षांची होती. तर मुलाचे नाव वेदांत होते आणि तो ४ वर्षांचा होता.

कर्जत तालुक्यातील आळसुंदेमध्ये ही घटना घडली आहे. रविवारी गोकूळचे आपल्या पत्नीसोबत वाद झाले होते. त्यामुळे त्याने रागाच्याभरात आपल्या दोन मुलांना जवळच्या विहीरीत फेकले होते. त्यामध्ये दोन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

गोकूळच्या घरापासून ६०० मीटर अंतरावर विहीर होती. त्या विहीरीमध्ये त्यांनी मुलांना फेकले होते. स्थानिक गावकऱ्यांना याबाबत कळताच त्यांची मुलांना बाहेर काढले होते. पण तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झालेला होता.

आता याप्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस याचा तपास करत आहे. गोकूळला दारुचे व्यसन असल्यामुळे त्याच्यात आणि पत्नीमध्ये नेहमी वाद होत होते. त्या वादामधूनच ही धक्कादायक घडल्याचे म्हटले जात आहे. पण पत्नी-पत्नीच्या वादात मुलांना जीव गमवावा लागल्यामुळे सगळीकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.