भेकड अन् भित्र्या, नालायक, लाज अन् माज; अंधारेंनी शेलक्या शब्दांत पोंक्षेंना झापलं, वाचा नेमकं काय म्हणाल्या

प्रमुख समाचार

प्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी एक पोस्ट केली होती. त्यांची मुलगी सिद्धी पोंक्षे ही पायलट झाल्यामुळे तिला शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी पोस्ट केली होती. पण त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी असे काही म्हटले आहे, ज्यामुळे ते वादात सापडले आहे.कू सिध्दी शरद पोंक्षे आज पायलट झाली. ईयत्ता ४ पासून तिने पाहीलेलं स्वप्न पुर्ण झालं. अत्यंत खडतर परीस्थितीतून,माझं आजारपण, कोरोना, लॉकडाऊन, आर्थिक स्थिती बिकट हे अडथळे पार करत. कोणतीही सवलत, आरक्षण नसताना केवळ मेहनत, बुध्दीमत्ता, परिश्रम व निष्ठा ह्या जोरावर ती पायलट झाली.बापाला आणखी काय हव नाही का? असे शरद पोंक्षे यांनी म्हटले होते.

मुलीला शुभेच्छा दिल्या असल्या तरी शरद पोंक्षेंनी यामध्ये आरक्षण आणि सवलतीवर भाष्य केलं होतं. त्यामुळे अनेकांना ती गोष्ट आवडली नसून त्यांच्यावर लोक टीका करत आहे. या वादात आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही उडी घेतली आहे.

सुषमा अंधारे यांनी एक फेसबूक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी जातीय आरक्षणावर भाष्य करत शरद पोंक्षेंना चांगलंच सुनावलं आहे. सुषमा अंधारे यांची ही पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.केलेला नसतो हे माहीत असेलच तुम्हाला त्यामुळे जी गोष्ट मिळवण्यामध्ये आपले कसलेही स्वकर्तृत्व नाही त्याची जशी लाज असू नये तसा माजही असू नये याचं भान असेलच तुम्हाला.

शरद राव तुम्ही एका दुर्धर आजारातून बरे झालात. पण या आजारा दरम्यान उपचार घेत असताना रक्त लघवी तपासण्याचे ठिकाण असेल, मेडिकल स्टोअरवर काम करणारी मुलं असतील, दरम्यान आवश्यकता असणारे भुलतज्ञ, केमोथेरपी देणारे डॉक्टर्स, रक्ताची गरजच पडली असेल तर रक्तपेढीत काम करणारे कर्मचारी किंवा दिवस रात्र सेवा करणाऱ्या नर्सेस यांच्या जाती तुम्हाला माहीत होत्या का हो….

असो बोलण्यासारखे बरेच आहे.. पण तूर्तास एवढेच.. ! लवकर बरे व्हा..!! ता. क. जातविषयक पित्त वारंवार उफाळून येत असेल तर बुद्ध गुरुनानक महावीर कबीर संत ज्ञानेश्वर तुकोबाराय यांच्या विचारांचा काढा नियमित घेत चला खात्रीने पित्त असे उफाळून येणार नाही. – प्रा. सुषमा अंधारे