नाशिक पुन्हा हादरलं ! किरकोळ वादातून १८ वर्षीय तरुणाचा खून, एकाची प्रकृती चिंताजनक !

प्रमुख समाचार

नाशिक पुन्हा हादरलं ! किरकोळ वादातून १८ वर्षीय तरुणाचा खून, एकाची प्रकृती चिंताजनक? अंबड पोलिस हद्दीतील संजीव नगर येथील शिवनेरी चौकात तरुणांमध्ये झालेल्या वादात दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने दोघांवर शस्त्राने वार केल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुस-याची प्रकृती गंभीर आहे. या घटनेत मेराज खान (१८) याचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा युवक इब्राहिम खान (२३) याचीकिरकोळ कारणावरुन वादातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. या वादात अल्पवयीन मुलाने त्याचे मित्र बोलावून इब्राहिम व मेराज यांच्यावर हल्ला केला. याप्रकरणी अल्पवयीन संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमागील कारण अद्याप पुढे आले नाही. तरुणांमध्ये वाद कोणत्या कारणावरुन झाला व त्यातून हा जीवघेणा हल्ला कसा झाला याचा पोलिस शोध घेत आहे.धारधार शस्त्राने हल्ला केल्यामुळे मेराज खान (१८) याचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा युवक इब्राहिम खान (२३) याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख, पोलिस निरिक्षक मनोहर कारंडे यांच्यासह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. नाशिकमध्ये या घटनेने खळबळ उडाली आहे या घटनेमुळे नाशिक शहर पुन्हा एकदा हादरले